Tuesday, January 25, 2011

ते निसटलेले क्षण..

का कोण जाणे...चुकल्या चुकल्यासारखा वाटतंय...
सगळं काही जागेवर असून...काहीतरी हरवल्यासारखा वाटतंय....

मोठा तर झालोय खूप...अगदी आकाशात उडेल एवढा...
भरारी हि घेतलीये...स्वप्नांच्या दिशेने..
तरी पण परत एकदा आई च्या कुशीत शिरावसा वाटतंय...
तिच्या हाताने मऊ मऊ साखर भात खावासा वाटतोय...
तिच्या डोळ्यात आलेले ते दोन थेंब माझ्या चिमुकल्या बोटांनी पुसावस वाटतंय..

जग आता छोटं वाटतंय...
हिंडायला मोकळं रान हि कमी पडतंय...
तरी पण परत एकदा बाबांचं बोट धरून चालावसं वाटतंय...
माझेच बाबा सगळ्यात चांगले असं म्हणून या दुनियेशी भांडाव वाटतंय...
त्यांनी मला उठून उभा कराव...म्हणून परत एकदा पडावं वाटतंय...

व्यवहार तर शिकलोय आता..
बेरीज - वजाबाकी , घेणं - देणं सगळं कसं अचूक जमतंय..
तरी पण परत एकदा....तितक्याच निरागसतेने भावाशी भांडावासा   वाटतंय...
परत एकदा तोच खेळ मांडून हसावंसं वाटतंय..
आधी तर नेहमीच जिंकायचो मी..पण आता मात्र हरावसा वाटतंय...

कळत नवतं तेव्हा काहीच...
आता कळत असून पण वळत नाहीये..
इच्छा तर खूप आहे मनात...
पण ते निसटलेले क्षण..
परत कधीच मिळणार नाहीयेत..

Saturday, January 22, 2011

आठवण आली तुझी की

आठवण आली तुझी की,  नकळत डोळ्यांत पाणी येतं..
मग आठवतात ते दिवस  जिथं आपली ळख झाली..
आठवण आली तुझी की,  माझं मन कासाविस होतं
मग त्याच आठवणीना..  मनात घोळवावं लागतं..
आठवण आली तुझी की,  वाटतं एकदाच तुला पाहावं
अन माझ्या ह्रदयात सामावुन घ्यावं..  पण सलतं मनात ते दुःख..
जाणवतं आहे ते अशक्य… कारण देवानेच नेलयं माझं ते सौख्य
पण तरिही………  आठवण आली तुझी की,
देवालाच मागतो मी….   नाही जमलं जे या जन्मी
मिळू देत ते पुढच्या जन्मी….

Monday, January 17, 2011

एकदा एक झाड़ वेलीच्या प्रेमात पडल ,

एकदा एक झाड़ वेलीच्या प्रेमात पडल ,
तिला पाहताच त्याला तीच वेड लागल ,

वेलीला विचारू तरी कस? या प्रश्नाने त्याला पछाडल,
पण, आपण जरा धीर धरावा अस म्हणत त्याने स्वतहाला सावरल,

वेळ मात्र आपली हसत ,खेळत राहत होती,
ते पाहून झाडाने तिच्याशी मैत्री केली होती ,

काही दिवसाने वेळ मात्र जमिनीवर पसरू लागली ,
ते पाहून झाडाने तिची विचारपूस केली ,

वेळ म्हणाली , झाडा मला तुझा आधार हवा आहे ,
तू मला आधार देशील का ??
यावर झाड़ म्हणाले , तू माझी होशील का ???

ते ऐकताच वेलिने नकारार्थी मान हलवली ,
ते पाहून झाडाची निराशा झाली ,

हिरमुसलेले ते झाड़ क्षणभर विचारात पडले ,
विचार करून त्याने वेलीला आधार देण्याचे वचन दिले ,

वचन देताच वेळ मात्र झाडाला बिलगली ,
अन , हसता हसता त्याची आसवे हळूच ओघळली ,

आसवे पुसत पुसत त्याने तिला आधार दिला ,
कारन .... तिला आधार देण हा त्याच्या प्रेमाचा भाग ठरला.......

Top 10 Mahatma Gandhi Quotes

  •  Mahatma GandhiThe weak can never forgive. Forgiveness is the attribute of the strong.
  • We must be the change we wish to see.

  • Live as if you were to die tomorrow. Learn as if you were to live forever.

  • The best way to find yourself is to lose yourself in the service of others.

  • An eye for eye only ends up making the whole world blind.

  • When I despair, I remember that all through history the way of truth and love has always won. There have been tyrants and murderers and for a time they seem invincible but in the end, they always fall - think of it, ALWAYS.

  • Strength does not come from physical capacity. It comes from an indomitable will.

  • What difference does it make to the dead, the orphans, and the homeless, whether the mad destruction is wrought under the name of totalitarianism or the holy name of liberty and democracy?


  • The moment the slave resolves that he will no longer be a slave, his fetters fall. He frees himself and shows the way to others. Freedom and slavery are mental states.

  • Whenever you are confronted with an opponent. Conquer him with love.

Sunday, January 16, 2011

आपल्याला मराठीची माहीती असायलाच हवी..



आपल्याला मराठीची माहीती असायलाच हवी...
 

. झाशीच्या राणी लक्ष्मीबाई नेवाळकर यांनी हिंदीत नव्हे तर मराठीतच "मी माझी झाशी देणार नाही" असे म्हटले आहे.

 

. रशिया, ऑस्ट्रेलियासह अनेक देशांमध्ये ४४ मराठी रेडीओ केंद्रे आहेत.
 
. हरयाणामध्ये १०. लाख मराठी राहतात. कराचीत (पाकिस्तान) नारायण जगन्नाथ विद्यालय मराठी शाळा असून इथले विद्यार्थी गुणवत्ता यादीत उत्तीर्ण होतात.

 

. मराठीप्रमाणॆ अन्य कुठल्याही भाषेतील साहित्यिकांचे दरवर्षी संमेलन होत नाही.
 
. मराठी भाषेत ४८ पेक्षा जास्त साहित्यप्रकार आहेत आणि १३० पेक्षा जास्त कलाप्रकार असून हा एक जागतिक विक्रम आहे. संगणकावर कंट्रोल पॅनेलमध्ये लोकेशन इंडीया केले तर सर्व कामे मराठी किंवा इतर भारतीय भाषांमध्ये सहज करता येतात.
 

 
. महाराष्ट्रातील काही इंग्रजी माध्यमातील शाळांनी गणित आणि विज्ञान हे विषय मराठीतच समजून देण्यास सुरूवात केल्यानंतर विद्यार्थ्यांना ते विषय लवकर चांगल्या पद्धतीने समजू लागले आहेत. ,
 
. देशाच्या आर्थिक उत्पन्नातील सर्वाधिक वाटा महाराष्ट्राचा आहे.
 
. सांगली कोल्हापूरमधील मराठी माणसांचे चांदी शुद्ध करण्याचे कारखाने भारतातील महत्वांच्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यांचा या व्यवसायात फ़ार मोठा वाटा आहे.
 
. पूर्वी अफ़गाणिस्तान ते कन्याकुमारी बडॊदा ते बंगाल असे मराठी राज्य पसरले होते. तेव्हा सबंध भारतात मराठी भाषा प्रथम क्रमांकावर तृतीय क्रमांकावर होती. आज मराठीचे स्थान दहावे आहे. मराठी माणसांनी जास्तीत जास्त व्यवहार मराठीत केले तर ही गुणी भाषा वरच्या स्थानावर पोहोचेल.

Friday, January 14, 2011

आज तुला मी नकोय

आज तुला मी नकोय
हे मला कधीच कळल होत
तू सोडून जाणार आहेस
मी कधीच जाणल होत
तुझ लग्न ठरलय
तुझ्या वागण्यातुन समजत होत
दुसरीकडे ओढ़ लागलेल तुझ मन
मला समजुन येत होत
खुप वाईट वाटत होत
पण काहीच सुचत नव्हत
दिवसातून हजारो मेसेज करणारी तू
पण आता सगळ बंद होत
खुप आठवण येते म्हणन
आय लव यू च बोलन
आता संपून गेल होत
हे अचानक अस होइल अस कधीच वाटल नव्हत
प्रतेक मिनिटाला मोबाईलकड़े पहान
आज ही तसच चालु होत
ये मूर्खा फोन करना
तुझा आवाज ऐकायचाय
अस बोलणार कोणच उरल नव्हत
वरुन हसताना दिसलो तरी
मन रडन सोडत नव्हत
तुझ्या विरहात जगन
खुप कठिण झाल होत
देवा माझ्या स्वीटहार्ट ला उदंड
आयूष्य दे एवढच मागण
तुझ्या चरणाजवळ होत
(काळजी घे मी कसाही जगेन पण तू सुखी रहा
तिला एवढच सांगायच होत ......आइ लव यू )

लई भारी ....भन्नाट मराठी विनोद !!!


एकदा टाटा मोटर्स चे काही अधिकारी "नॅनो" बद्दलचा प्रतिसाद पाहण्यासाठी पुण्यात सर्व्हे घेत असतात. फिरत फिरत ते सदाशिव पेठेत तात्यांच्या घरी येतात.

अधिकारी : नमस्कार ! आमच्या "नॅनो" बाबतीत आपले काय मत आहे ?
तात्या : मला तुमच्या ह्या "न्यानो" गाडीचं नाव अगदी सार्थ वाटतं..
अधिकारी : का बरं ?
...तात्या : तुमचे सेल्समन म्हणतात " न्या ".. आणि आम्ही म्हणतो " नो " !

 
----------------
पक्क्या : तू धरती पे चाहे जहा भी रहेगी तुझे तेरी खुशबू हे पेहचान लुंगा..

चिंगी : आई शप्पथ, मला आधीपासूनच शंका होती कि तू तर साल्या कुत्राच आहेस...

 

 
----------------
मन्या पाटील लंगडत लंगडत शाळेत ऊशीरा पोचला.
इंग्रजीचे सर ओरडले."व्हाय आर यू लेट?"
इंग्रजीत सुमार मन्या म्हणाला, "सर रस्त्यावर चिख्खल झाला होता आणि तिथे उभ्या बैलाने ढुशी मारली. माझा पाय मोडला. म्हणून ऊशीर झाला."
सर पुन्हा ओरडले, "टॉक इन इंग्लिश!"...
हजरजबाबी मन्याने म्हटले,"सर देयर वॉज चिखलीपिकेशन ऑन रोड. काऊज हसबण्ड केम. ह...ी मारिंग मी शींगडा मेड मी लंगडा. सो आय कम लेट!"

 
----------------
काल मला १० जणांनी खूप मारला..
संता : मग तू काय केलास?
बंता : मी म्हटलं, साल्यानो दम असेल तर एक एक जण या..
संता : मग?
बंता : मग काय, साल्यांनी एकेकाने येऊन परत मारलं.....

 
----------------
परीक्षा सभागृहातील सर्वात चांगली गोष्ट कोणती?

हे एकच ठिकाण आहे कि जिथे तुम्ही मुलीला मोकळेपणाने बोलू शकतो.

" जरा दाखव कि "
...
आणि बरयाचवेळा ती दाखवतेही.... :P :D :D

 

 
----------------
गण्या : अरे मित्रा " अरेंज मॅरेज " म्हणजे काय ?

बंड्या : सोप्प आहे रे , समज... तू रस्त्यावरून चालला आहेस आणी अचानक तुला नागीण चावते ..

गण्या : ठीक आहे ...आणी " लव मॅरेज " म्हणजे काय ?
...
बंड्या : लव मॅरेज " म्हणजे तू त्या नागीण कडे जातो आणी तीला बोलतो " फूस फूस ... चाव ना मला ..चाव .."

 

 
----------------
इंग्लिश मॉम म्हणते गुड नाइट

हिंदी मा म्हणते शुभ रात्री

मुस्लीम मा म्हणते शब्बा खैर
...
आणि आपली मराठमोळी आई म्हणते, अरे आग लाव त्या मोबाईलला आणि झोप आता.. 

 
----------------
पक्क्याच बायकोबरोबर भांडण चाललं होते....

बायको (वैतागून) : तुमच्या डोक्यात ना नुसतं शेण भरलय......

पक्क्या : अच्छा, आता मला कळले की तू इतका वेळ माझे डोके का खाते आहेस ते...

 

 
----------------
संता : काल मी माझ्या बायको ला driver बरोबर सिनेमाला जाताना पाहिलं

बंता : अरे मग तू पण तिच्या मागोमाग जायचास ना सिनेमाला, म्हणजे काय ते तुला कळल असतं...
...
संता : अरे बर झालो नाही गेलो ते, तो सिनेमा मी आधी पहिला होता..

 
----------------
मंग्या कानात बाळी घालून फिरत होता,
चंद्या : कानात बाळी? हि नवीन फॅशन तू कधी पासून सुरू केलीस?
मंग्या : अरे बायको माहेरी जाऊन आल्यापासून..
चंद्या : म्हणजे वहीनीनी माहेरून तुझ्यासाठी बाळी आणली की काय ?
मंग्या : नाही रे गाढवा !!! ही बाळी तिला माझ्या अंथरुणात सापडली, आता माझीच आहे सांगितलं म्हणून झक मारत घालावी लागतेय..

 

 
----------------
मुलगा : बाबा 1 ग्लास पाणी द्या ना ?
बाप : स्वतः उठुन घे...?
मुलगा : प्लीज द्या ना बाबा..
बाप : आता थोबाडित मारीन तुझ्या!
मुलगा : थोबाडीत मारायला याल तेव्हा येताना पाणी आणा.

 
----------------
बहिण : मुलगा कसा आहे?
भाऊ : मुलगा चांगला आहे, engineer आहे, दिसायला फिल्मचा हिरो वाटतो...
बहिण : कुठल्या फिल्मचा हिरो?
भाऊ : "पा".

 
----------------
मल्लिकाकडे एक नवीन नोकर कामाला लागतो, त्याला सकाळी मल्लिका किचन मध्ये दिसते, ती मिक्सर चालवत असते,
नोकर : काय म्याडम काय बनवता आहात?
मल्लिका : काही नाही रे कपडे धुते आहे.

 
----------------
नवरा : तू मला आत्ता कुत्रा म्हणालीस?

बायको लक्षच देत नाही,

नवरा पुन्हा विचारतो.
...
काहीच उत्तर नाही.

तो पुन्हा विचारतो.

बायको : नाही म्हणाले पण आता भुंकणे थांबवा जरा!!

 
----------------
क्क्या : काय रे एवढ्या हळू आवाजात कोणाशी बोलतो आहेस?

मंग्या : अरे बहिणीशी रे ...

पक्क्या : अरे मग एवढ्या हळू आवाजात बोलायची गरज काय ?
...
मंग्या : बहिण तुझी आहे.... 

 
----------------
बाप : या वेळी नापास झालास तर यापुढे मला 'बाबा' म्हणून हाक मारू नकोस चंद्या.
सालाबादाप्रमाणे याही वर्षी आपला चंद्या नापास झाला,
बाप : काय लागला निकाल?
चंद्या : माफ कर रे रम्या, तुला बाबा म्हणून हाक मारण माझ्या नशिबात नाहीये बहुतेक...

 
----------------
बंड्या चिंगीच्या बाबाना जाउन भेटतो...
बंड्या : मी तुमच्या मुलीवर प्रेम करतो ..
चिंगीचे बाबा : कधी पासून .
बंड्या : गेल्या पाच माहीन्या-पासून
चिंगीचे बाबा : हे शक्य नाही ...
...बंड्या : मग अजुन चार महीने थांबा ... तुमची खात्रीच पटेल...

 
----------------
आजोबा : पिंट्या लप, तुला शोधत तुझी टीचर आली आहे.
पिंट्या : आजोबा तुम्हिच लपा.
आजोबा : का रे.. ???
पिंट्या : अहो आजोबा, तुम्ही मेलात म्हणुन आठ दिवस सूटी घेतली आहे मी....

 
----------------
संता : अरे यार बंते, हा sent message काय प्रकार आहे ?
बंता : काढलीस ना लाज, एवढं पण माहीत नाही..
sent message म्हणजे perfume वाला message...